Sunday, February 7, 2010

घडामोडी: ग्रामीण डाक सेवाकंच्या पेंशन विषयी ....

प्रचलित ग्रामीण डाक सेवक नियमावालीत  ग्रामीण डाक सेवकाना पेंशन नाही.  प्रचलित चतुर्थ श्रेणी आणि  पोस्टमन भर्ती नियमावालीनुसार ग्रामीण डाक सेवकाना ५० वर्षा पर्यन्त खाते अंतर्न्गत सदर पदांमधील नियमित समवेशानंतर किमान १० वर्षे सेवा पूर्ण असल्यास (९ वर्षे आणि ९ महीने )  पेंशन मिळते. परन्तु काही ग्रामीण डाक  सेवकांची  १० वर्षे सेवा पूर्ण होत नाही किंबहुना ९ वर्षे आणि ९ महीने देखील   पूर्ण होत नाही. अश्या ०१.०१.२००४ पूर्वी खात्यात नियमित समावेश   असलेल्या ज्यांची  ९ वर्षे आणि ९ महीने देखील पूर्ण होत नाही व पेंशनला  मुकावे  लागले आहे अश्या सर्व ग्रामीण डाक सेवकांची माहिती केंद्रीय   आस्थापनाने पत्र क्रमांक १९-१२/२००९ - जीडीस दिनाक  १८  जानेवारी २०१० द्वारे सर्व सी. पी. एम. जी. /  पी. एम. जी. कडे मागीतली आहे.