Thursday, February 11, 2010
Sunday, February 7, 2010
घडामोडी: ग्रामीण डाक सेवाकंच्या पेंशन विषयी ....
प्रचलित ग्रामीण डाक सेवक नियमावालीत ग्रामीण डाक सेवकाना पेंशन नाही. प्रचलित चतुर्थ श्रेणी आणि पोस्टमन भर्ती नियमावालीनुसार ग्रामीण डाक सेवकाना ५० वर्षा पर्यन्त खाते अंतर्न्गत सदर पदांमधील नियमित समवेशानंतर किमान १० वर्षे सेवा पूर्ण असल्यास (९ वर्षे आणि ९ महीने ) पेंशन मिळते. परन्तु काही ग्रामीण डाक सेवकांची १० वर्षे सेवा पूर्ण होत नाही किंबहुना ९ वर्षे आणि ९ महीने देखील पूर्ण होत नाही. अश्या ०१.०१.२००४ पूर्वी खात्यात नियमित समावेश असलेल्या ज्यांची ९ वर्षे आणि ९ महीने देखील पूर्ण होत नाही व पेंशनला मुकावे लागले आहे अश्या सर्व ग्रामीण डाक सेवकांची माहिती केंद्रीय आस्थापनाने पत्र क्रमांक १९-१२/२००९ - जीडीस दिनाक १८ जानेवारी २०१० द्वारे सर्व सी. पी. एम. जी. / पी. एम. जी. कडे मागीतली आहे.
Thursday, February 4, 2010
पोस्टमास्टर केडर अस्तित्वात आली................
पोस्टमास्टर केडर अस्तित्वात आली ...... डाक प्रशासनाकडून अद्यादेश जारी . .....
२०९७ नि च श्रे साठी पोस्टमास्टर - I , ५११ उ च श्रे - II साठी पोस्टमास्टर - II , ४९५ उ च श्रे - I साठी पोस्टमास्टर - III , ११६ पी एस एस ग्रुप - बी (प्रवर पोस्टमास्टर ) ही नवीन पदनामे जाहीर ....
सद्याच्या केडर मधील कर्मचारी सदर पदांसाठी एक वेळ विकल्पस पात्र .....
Wednesday, February 3, 2010
ग्रामीण डाक सेवक - स्वास्थ्य विमा
नटराज मूर्ती अहवालातील परिच्छेद क्रमांक १५.६.१ नुसार राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजने अंतर्गत समावेश करण्यासाठी ०१.०१.२०१० पर्यंतच्या सर्व नियमित ग्रामीण डाक सेवकांची माहिती पत्र क्रमांक ६-१०/२००९ पे- II द्वारे केंद्रीय अस्थापनाने सर्व CPMG / PMG ना विचारली आहे. या योजने अंतर्गत नियमित ग्रामीण डाक सेवकांच्या घरातील ५ व्यक्ति म्हणजे स्वतः , पत्नी, मूल, आई आणि वडिल समावेश आहे. विम्याचे पैसे सरकार आणि ग्रामीण डाक सेवक दोघे मिळून भरणार आहेत
Subscribe to:
Posts (Atom)