14 एप्रिल. या दिवशी जन्माला आला महामानव.... डॉ भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर ..... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असंही म्हटलं जातं. दलितांना देशाच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं महत्वपूर्ण काम त्यांनी केलं...जातीव्यवस्थेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा सर्वश्रूतच आहे.आपल्या समाजाच्या हक्कासांठी, न्यायासाठी त्यांनी जन्मभर लढा दिला. त्यांनी दिलेल्या लढ्यामुळेच आज दलितवर्ग मानाने जगतोय. शिका... संघटीत व्हा.... आणि लढा द्या असं आवाहन डॉ आंबेडकरांनी काही वर्षांपुर्वी आपल्या समाजाला केलं होतं. आपल्या समाजाला न्याय मिळावा, हक्क मिळावा यासाठी डॉ.आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. १४ एप्रिल १८९१ साली जन्माला आलेल्या या महामानवाने दलितांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलयं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. डॉ बाबसाहेब आंबेडकर मुळचे रत्नागीरी जिल्हा्यातल्या आंबवडे या गावचे. आपल्या मुलांनी शिकावं अशी बाबसाहेबांच्या वडीलांची मनापासून इच्छा होती. मात्र सर्व भावंडांमद्ये बाबासाहेब आंबेडकर फक्त शिकले नाही तर आपल्या समाजाला त्यांनी एक दिशा दाखवली. १९३५ साली त्यांनी इंडिपेंन्डस लेबर पार्टी स्थापन केली.या पार्टींने १९३७ साली झालेल्या निवडणूकीमध्ये १५ जागा जिंकल्या होत्या. अतिशय प्रखर बुद्धीमत्ता असलेल्या डॉ आंबेडकरांनी द बुद्ध अॅन्ड हिज धम्मा हे अभ्यासपुर्ण पुस्तक लिहीले. दलितांना प्रकाशाची वाट दाखवणा-या या महामानवाचा ६ डिसेंबर १९५६ रोजी झोपेतच मृत्यू झाला.अंधाराच्या गर्तेत अडकलेल्या आपल्या समाजबांधवांना प्रकाशात आणण्याचं काम आंबेडकरांनी केलं. या महामानवाला आदरांजली...!
Sunday, April 11, 2010
Subscribe to:
Posts (Atom)