डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांसाठी घेण्यात आलेल्या केंद्रीय (दिल्ली ) स्तरावरील परीक्षेत महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रामधून १००% मराठी उमेदवारांची निवड...
२०११ आणि २०१२ च्या डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासंबंधी व बारावी परीक्षेत ६०% वर गुण असलेल्या सर्व उमेदवारांना डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेला बोलावण्यात यावे अशी आग्रही भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनची होती. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार माननीय शिरीष पारकर सरचिटणीस मनसे व अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना यांनी अमराठी उमेदवार निवडल्यास "याद राखा" असा सज्जड दम दिला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनच्या मागणीप्रमाणे बारावी परीक्षेत ६०% वर गुण असलेल्या सर्व उमेदवारांना डाक सहाय्यक / छटाई सहाय्यक पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेला बोलावण्यात आले व महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रामधून १००% मराठी उमेदवारांची निवड करण्यात आली.
हा महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचा मोठा विजय आहे. या मोठ्या विजयात माननीय माननीय शिरीष पारकर सरचिटणीस मनसे व दिलीप नाईक सरचिटणीस मनजसे तसेच टपाल विभाग जनाधिकार सेनचे अध्यक्ष विजयानंद पेडणेकर, सरचिटणीस संतोष परब, खजिनदार वासुदेव सावंत, सह-सरचिटणीस संजय घाडीगावकर, संजय लोंढे आणि चिटणीस सौ. नेहाताई रिकामे तसेच प्रशासन विभाग जनाधिकार सेनचे अध्यक्ष पांडुरंग औवकीरकर यांचा सिंहाचा वाटा आहे.