Monday, February 28, 2011

औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक जानेवारी २०११  चा निर्देशांक AICPI (IW) 3 पॉइंट्सनी वाढला.... जानेवारी २०११ चा निर्देशांक १८८  जाहीर.




Saturday, February 26, 2011

सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्या. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!





लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी

आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥

आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळिकळित लाजते मराठी॥

येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी





Wednesday, February 23, 2011

ग्रामीण डाक सेवाकांची पदे भरण्यासाठीचे आदेश डाक निदेशालायाकडून जाहिर ...
परंतु  महाराष्ट्रातील गेली १० वर्ष रिक्त असलेली सुमारे  ३२०० ग्रामीण डाक सेवाकांची पदे भरण्याची  प्रक्रिया चालू  करण्यास महाराष्ट्र  नवनिर्माण  जनाधिकार सेनेने  हे  आदेश निघण्यापुर्वीच प्रशासनास   भाग पडले ...
हा "मराठी माणसा" चा आणि  "टपाल विभाग जनाधिकार सेने" चा  मोठा विजय आहे....  

Tuesday, February 15, 2011

Monday, February 7, 2011

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना टपाल कार्यालयातील भर्ती बाबत आग्रही... "मराठी" चा मुद्दा पुन्हा रंगणार...

महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना टपाल कार्यालयातील भर्ती बाबत आग्रही... "मराठी" चा मुद्दा पुन्हा रंगणार...  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिंटणीस आणि  महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेनेचे अध्यक्ष मा. शिरीष पारकर यांची   मा. फैज़ - उर- रहमान मुख्य पोस्टमास्टर जनरल बरोबर थेट भेट. "मराठी" चा मुद्दा पुन्हा रंगणार... मराठी उमेदवारना निवडण्याची ग्वाही...



    



Wednesday, February 2, 2011

टपाल खात्या द्वारे ई - व्ही पी पी योजना चालू