केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई
भत्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली असून तो आता मूळ वेतनाच्या १०० टक्के
झाला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई
भत्त्याचा अतिरिक्त हप्ता देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने
आज मंजुरी दिली. १ जानेवारी २०१४
पासून मूळ वेतनाच्या १०० टक्के याप्रमाणे महागाई भत्ता मिळेल. यामुळे सरकारी
तिजोरीवर वार्षिक ११०७४.८० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.