skip to main |
skip to sidebar
डाक सहायक आणि छटाई सहायक भर्ती २०११ आणि २०१२ प्रकियेत गोंधळ- नोकरीची संधी हिरवण्याचा योजनाबद्ध पद्धतशीर कट
डाक सहायक आणि छटाई सहायक भर्ती २०११ आणि २०१२ दिनांक ११.०८.२०१२ रोजी लोकसत्ता पेपर मध्ये प्रसिद्ध होते.
भरती प्रकियेत गोंधळ आहे. संपूर्ण भारतासाठी फक्त ३ लाख फॉर्म छापले
जातात. फक्त २०००० फॉर्म महाराष्ट्रातील उमेदवारांना करिता ठेवले जातात. एक
दिवसात फॉर्म संपतात. नंतर २० दिवस फॉर्म महाराष्ट्रात कोठेच मिळत नाहीत.
काही दिवसांनी परत २०००० फॉर्म
प्रिंट करून पाठविले जातात. मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात
फॉर्म काही दिवस दाबून ठेवले जातात. ऑन लाईन
रजिस्ट्रेशन ०३.०९.२०१२ पासून सुरु होते. २४ तासात फॉर्म इमेल केले जातील
अशी वेब वर दाखविले जाते. इमेल ने आलेला फॉर्म प्रिंट काढून भरून स्पीड
पोस्ट किंवा रजिस्टर पोस्ट ने पाठवायचे असतात. सामान्य उमेदवार
०४.०९.२०१२ पासून रजिस्ट्रेशन करतो.
०४.०९.२०१२ पासून वेब जाम होते. आठवडा होता उमेदवार वाट बघत बसतात. दाबून
ठेवलेले फॉर्म मुंबई बाहेरील विभागात विक्री साठी पाठविले जातात.
परंतु मुंबई तील उमेदवारांना फॉर्म मिळत नाहीत. उलट अधिकारी सांगतात की
अलिबाग, मुरबाड, पालघर , येथून आणा. आणि भरा. १० दिवस होऊन ही फॉर्म
इमेल ने येत नाहीत शिवाय विकत ही मिळत नाहीत. एकंदरीत मुंबई तील
उमेदवारांची नोकरीची संधी हिरवण्याचा योजनाबद्ध पद्धतशीर कट वाटतो.
महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना (टपाल विभाग) ने निवेदन दिले.